माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार अन तात्कालीन राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांचे चिमूर नगरीत नमन व लौकिक… — ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांचे संवेदनशील स्मरण.. — माजी आमदार डॉ.अविनाश वारजूकर आणि कर्तव्य… — डॉ.सतिष वारजूकरांसह कांग्रेस पदाधिकारी कामाला लागले… — गड जिंकणार?

 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

           चिमूर विधानसभा मतदार संघ म्हणजे महाराष्ट्र राज्यसह देशात नावलौकीकास असलेला.हा मतदार संघ केव्हा कुणाला साथ देईल आणि कुणाचे केव्हा भाग्य खूलवेल हे सांगणे कठीण असते.

            मात्र,कांग्रेस पक्षाचे ओबीसी सेल महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, चिमूर विधानसभा मतदार संघ समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.सतीश वारजूकर हे चिमूर व नागभीड तालुकातंर्गत पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिमूर विधानसभा मतदार संघातंर्गत पक्ष मजबूतीच्या व नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याच्या कामाला उत्स्फूर्तपणे लागले आहेत.

***

 माजी खासदार विलासराव मुत्तेमवार

             कांग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी नवीन व नवीकरणीय केंद्रीय उर्जा राज्यमंत्री मंत्री विलासराव मुत्तेमवार(स्वतंत्र प्रभार) यांनी चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे तिनदा नेतृत्व करतांना देशाचे तात्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा व प्रधानमंत्री पि.व्ही.नरसिंहराव यांना चिमूर नगरीत आणले होते.

             तात्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा व प्रधानमंत्री पि.व्ही.नरसिंहराव यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व चिमूरच्या हुतात्म्यांना नमन करीत चिमूरचे नाव दुसऱ्यांदा देशात नावलौकीकास आणले होते.

            चिमूर लोकसभा मतदार संघातंर्गत विकासासाठी आत्मीयतेतून धडपड सुरु असताना  माजी खासदार विलासराव मुत्तेमवार यांना चिमूर लोकसभा मतदार संघातील मतदारांनी पाडून चिमूर लोकसभा मतदार संघाला मागे नेले याची जाणीव त्यांना झाली नसावी असे आजतरी दिसून येते आहे.

***

   ना.विजयभाऊ वडेट्टीवार

            याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी सुद्धा चिमूर विधानसभा मतदार संघाचे तिनदा नेतृत्व करुन चिमूर मतदार संघातंर्गत विकास कामांना भरपूर गती दिली व अनेक विकास कामातंर्गत चिमूर मतदार संघातील खेडेपाडे रस्त्यांनी जोडून ग्रामीण भागातील नागरिकांच्या दळणवळणाची महत्वपूर्ण व्यवस्था केली.

           याचबरोबर प्रशासनीक व वैयक्तिक स्तरावर चिमूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांना सहकार्य करुन भेदभाव न करता त्यांच्या अनेक प्रकारच्या समस्या दूर केल्यात हे विसरता येत नाही..

***

     डॉ.अविनाश वारजूकर

         माजी आमदार,माजी खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष तथा महाराष्ट्र कांग्रेस कमिटीचे राज्य महासचिव डॉ.अविनाश वारजूकर यांना चिमूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी महाराष्ट्र विधानसभाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली.

        त्यांनीही आपल्या दोन्ही प्रकारच्या कार्यकाळात चिमूर विधानसभा मतदार संघातील विकास कामांकडे जातीने लक्ष दिले या वास्तव्याला सुद्धा नाकारता येत नाही.

        त्या काळात निधी कमी असताना त्यांनी चिमूर विधानसभा मतदार संघातील कामाकडे महाराष्ट्र शासनाचे वारंवार वेधलेले लक्ष नजरेआड करता येत नाही.

***

       डॉ.सतीश वारजूकर

              चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा माजी विरोधी पक्षनेते डॉ.सतीश वारजूकर यांची जिल्हा परिषदेतील कामकाजाची कार्यपद्धत दमदार होती.कुठलेही कामे वेळ न दवडता निकाली काढण्याची त्यांची हातोटी बऱ्याच जणांना जमणारी नाही.

           ते चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्रालयातून,विविध विकास महामंडळतून,शासनाच्या विविध विकास योजनातून चंद्रपूर जिल्हातंर्गत विकास कामांना गती देण्यासाठी निधी खेचून आणण्यात पटाईत होते.

        तद्वतच स्वतःच्या पक्ष कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष न करता त्यांचे कार्यालयीन कामे आवर्जून काढून देत.याचबरोबर इतरांचे कार्यालयीन कामे संवेदनशील कर्तव्यातून निकाली काढत होते.

***

             राजकारण व समाजकारण म्हटले की वैयक्तिक स्तरावर एकमेकांचे मतभेद असतात हे विसरून चालता येत नाही.मात्र दुराभाव बाजूला ठेवला तर संधीचे सोने करता येते असे खेड्यातील बुजरुग लोक चौपाटीवर चर्चा करताना बोलत असतात..आणि त्यांचे हे मार्मिक बोल सखोल संदेशाचा भाग आहे हे सातत्याने समजून घेतले तर यशस्वी मार्ग स्वतःच्या जवळच असतो हे लक्षात येतय.

               चिमूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्याची संधी डॉ.सतीश वारजूकर यांना चालून येत असल्याची सुचक चिन्हे आहे.नव्हे तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र विधानसभा सदस्यत्व लोकप्रतिनिधीत्वाचा अमुल्य क्षण जवळ येतो आहे.

           डॉ.सतीश वारजूकर म्हणजे संवेदनशील व गतिशील नेतृत्व असल्याने ते चिमूर विधानसभा मतदार संघात आपल्या पदाधिकाऱ्यांसह व कार्यकर्त्यांसह कामाला लागले आहेत.

         लोकहिताच्या उपक्रमातंर्गत व इतरेत्र कार्यक्रमातंर्गत जागरुकपणे कार्य करताना त्यांची समयसूचकता कमी पडू नये….