Home Political इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या कमळ या चिन्हावर मतदान करून सर्व उमेदवार विजयी...

इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या कमळ या चिन्हावर मतदान करून सर्व उमेदवार विजयी करा :- उमेदवार अंजली घोगरे व सुधीर कोकाटे यांचे मतदारांना आवाहन… — बावडा लुमेवाडी गट व लुमेवाडी गणातून उमेदवार अंजली घोगरे व सुधीर कोकाटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद….

  बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

         2026 च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूकीसाठी बावडा लुमेवाडी जिल्हा परिषद गटातून सौ अंजली अभिजीत घोगरे तर लुमेवाडी गणात पंचायत समितीचे उमेदवार सुधीर प्रकाश कोकाटे यांच्या प्रचाराला मतदार संघातून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

           प्रदीपदादा गारटकर, प्रवीणभैया माने, यशवंत माने या सर्वांचे हात बळकट करण्यासाठी इंदापूर तालुक्याच्या काना कोपऱ्यात भाजपलाच साथ मिळत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावोगावी भेटी, संवाद आणि विकासा भिमुख यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे. जिल्हा परिषद बावडा लुमेवाडी गट व लुमेवाडी गणात परिवर्तन होणारच असल्याचे दिसू लागले आहे .

           उमेदवार सौ.अंजली अभिजीत घोगरे व उमेदवार सुधीर प्रकाश कोकाटे यांना मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याने परिसरात वातावरण चांगलेच निर्माण झालेले आहे. नरसिंहपुर, टणु , गिरवी, पिंपरी बुद्रुक, गणेशवाडी, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, सराटी, चाकाटी, आधी सर्व भागातील मतदार भाजपलाच साथ देऊन कमळ चिन्हावर मतदान करून जास्तीत जास्त मतांनी विजय करणार असल्याचे बोलत आहेत. जसजशी मतदान तारीख जवळ येईल, तस तशे मतदार व कार्यकर्त्याचा पाठिंबा मिळत आहे.