एमआयडीसी बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मिळाला मोबदला.

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

पुणे : शिरूर तालुक्यातील कारेगाव रांजणगाव व ढोकसांगवी या गावांमधील ८७ शेतकऱ्यांच्या जमिनींचे रांजणगाव एमआयडीसी करता असून सन १९९२ मध्ये संपादन झाले होते. मात्र तत्कालीन प्रचलित दरापेक्षा कमी दराने भूसंपादनाचा मोबदला मिळाल्याने एमआयडीसीकडून वाढीव मोबदला मिळण्याकरता शेतकऱ्यांनी कोर्टात धाव घेतली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे तब्बल ३० वर्षे शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत होते. 

          याबाबत शिरूर चे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही वर्षांपासून उद्योगमंत्री व एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून अनेकदा बैठका घेत शेतकऱ्यांची बाजू परखडपणे मांडली. त्यास यश येऊन या शेतकऱ्यांना त्यांच्या मागणीप्रमाणे योग्य मोबदला देण्याचा निर्णय राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत यांनी घेतला. त्यामुळे कारेगाव, ता.शिरूर येथे संबंधीत शेतकरी व ग्रामस्थांच्या माध्यमातून वचनपूर्ती सोहळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास आढळराव पाटील यांनी भेट देऊन येथील शेतकऱ्यांशी हितगुज केले.शेतकऱ्यांना त्यांचा न्याय-हक्क मिळवून दिल्याबद्दल तेथील नागरिकांना अतिशय समाधान वाटले.

          यावेळी झालेल्या कार्यक्रमास शिवसेना आंबेगाव तालुकाप्रमुख व जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, शिवसेना शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, युवासेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, प्रदेशाध्यक्ष जनता दल सेक्युलर महाराष्ट्र राज्य नाथाभाऊ शेवाळे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी सचिन बारवकर, पुणे जिल्हा भाजपा सचिव अनिल नवले, प्रदेशाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा गणेश ताठे, तालुकाध्यक्ष भाजपा विद्यार्थी आघाडी शिरूर मयूर गणेश गावडे, प्रदेश उपाध्यक्ष भाजपा कामगार मोर्चा तुळशीदास दुंडे, कारेगाव सरपंच सौ.निर्मला नवले, कारेगाव उपसरपंच तुषार नवले, ग्रामपंचायत सदस्य तेजस फलके, मा.उपसरपंच कारेगाव सयाजी नवले, मा.उपसरपंच कारेगाव नवनाथ नवले, उपाध्यक्ष शिरूर आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राहुल गवारे आदी मान्यवर उपस्थित होते.