गोंडवाना संघर्ष समिती व्दारे गोंडी भाषा दिवस साजरा… 

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशीवणी

कन्हान : – शहरातील डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौक येथे गोंडवाना संघर्ष समिती व्दारे गोंडवाना रत्न मोती रावन कंगाली यांची जयंती गोंडी भाषा दिवस म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.        

        शुक्रवार (दि.२) फेब्रुवारी २०२४ ला सकाळी ११ वाजता गोंडवाना संघर्ष समिती कन्हान व्दारे गोंडवाना गणतंत्र पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष तुलेश्वरजी यांच्या अध्यक्षे त व गोगपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरिशजी उइके, उपाध्यक्ष सुखलालजी मडावी यांच्या हस्ते गोंडवाना रत्न मोतीरावन कंगाली यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

          याप्रसंगी गोगपाचे मधुकर उईके, धनराज मडावी, राजेश इळपाते, सुधाकर आत्राम, दिनेश सीडाम प्रामुख्याने उपस्थित होते. प्रथम मान्यवर पाहुण्याचे समिती पदाधिकाऱ्यानी जंगी स्वागत केले.

           यावेळी गोंडियन संस्कृती, भाषा प्रचार, प्रसार व त्याचे महत्वा विषयी मान्यवरानी मार्गदर्शन करून गोंडवाना रत्न मोतीरावन कंगाली यांची जयंती गोंडी भाषा दिवस म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोजक बंडुजी इळपाची, रामलाल पट्टा, राजेश टेकाम, सोनु मसराम, प्रल्हाद कुमार, अरविंद मसराम , प्रकाश कुमरे, जयराम भलावी, अनिल पेदांम, शिवा कुर्वे, रत्ना मडावी, गीता इळपाची, सोनम इळपाते, योगिता इळपाते, केसर सिरसाम, मुन्नी नागवंशी, मंगला पंधराम, राधा पंधराम, छाया मसराम सह समाज बांधव आणि महिलानी उपस्थित राहुन मौलाचे सहकार्य केले.