कन्हान हददीत कोबींग ऑपरेशन दरम्यान दोन अग्निशस्त्र,३ तलवार,एक लोखंडी कोयतासह चार आरोपी गजाआड.. — विविध कलमातंर्गत गुन्हा दाखल.

 

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- तालुक्यातील कन्हान पोलिस स्टेशन हद्दी अंतर्गत आज शनिवारला पोलीस अधिक्षक विशाल आनंद,अप्पर पोलीस अधिक्षक संदिप पखाले यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे रामटेक विभाग रामटेक व अतिरीक्त कार्यभार कामठी विभाग,कन्हान उप विभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड मॅडम,परिपो अधिक्षक अनिल मस्के,ए.परि.पो.पोलीस अधिकारी झालटे सा,पो.नि. मकेश्वर पोस्टे कन्हान,पोनि. कोकाटे,स्था.गु. शा. ना.ग्रा. सपोनि चौव्हान पोहवा / मुदस्सर जमाल, हरिश सोनभद्रे, पोशि/ आकाश सिरसाट, अश्विन गजभिये, निखिल मिश्रा, अनिल यादव तसेच २५ अकारी व ११० कर्माचारी यांच्यासह पोस्टे कन्हान हद्दीत कोबींग ऑपरेशन राबवण्यात आले असता सदर ऑपरेशन दरम्यान एकुण ४२ संसयीतांच्या राहते घरांची झडती घेण्यात आली.

          त्या दरम्यान आरोपी नामे १) साहिल अब्दुल खान रा. खदान नं. ०३ कन्हान यांच्या ताब्यातुन १ माउझर,१ जिवंत काडतुस,२ ) परशुराम मखंजु गौतम रा. फुकट नगर कन्हान यांच्या ताब्यातुन १ देशीकटटा,१ जिवंत काडतुस व १ लोखंडी तलवार, ३ ) अमन अजित सिंग रा. खदान नं. ०६ कन्हान यांच्या ताब्यातून २ लोखंडी तलवार,४). निखील उर्फ सन्नी अनिल गजभिये रा. अशोक नगर कन्हान यांच्या ताब्यातुन १ लोखंडी कोयता असा मुददेमाल जप्त करण्यात आला.

          दोन अग्निशस्त्र,३ तलवार व एक लोखंडी कोयता मिळुन आल्याने सदर ४ ही आरोपींवर भारतीय हत्यार कायदा अन्वये कायदेशिर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आला आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आले.